भारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?

साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत. 

Updated: Mar 25, 2015, 09:12 PM IST
भारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला? title=

मुंबई : साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत. 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि ट्रेन ऑफिस, सर्वच ठिकाणी फक्त क्रिकेटचा बोलबाला आहे. टीम इंडियाची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय प्रेक्षक प्रचंड सुखावले आहेत. पण, सट्टेबाज मात्र चांगलेच संभ्रमात आहेत. भारत ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सचं बलाबल पाहता दोन्ही टीम्सना वर्ल्डकप फायनल गाठण्याची समान संधी आहे. त्यामुळे सट्टेबाज जोरात सट्टा घेऊ लागले आहे. 

भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात सट्टेबाजांची पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. ऑस्ट्रेलियासाठी एका रूपयाला 44 पैसे असा भाव आहे. तर टीम इंडियाला 1 रूपयाला 1 रूपया 44 पैसे असा भाव आहे. 

'ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्डकप जिंकेल' असा सट्टेबाजाराचा होरा आहे. पण भारतीय बॉलर्स आणि आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी पाहता भारतालाही कमी लेखून चालणार नाही असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. 

वर्ल्डकप विजेता म्हणून ऑस्ट्रेलियाला एका रूपयाला 30 पैसे तर टीम इंडियाला 60 पैसे असा भाव आहे. तर न्यूझीलंडला मात्र 1 रूपया 10 पैसे असा भाव सट्टेबाजांनी निश्चित केलाय. 
 
सट्टेबाजांचे हे भाव पाहता त्यांची पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. पण टीम इंडिया सट्टेबाजाराचे हे सर्व अंदाज खोटे ठरवेल आणि सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारत फायनलमध्ये न्यूझीलंडचाही फडशा पाडेल यात शंकाच नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.