12 ऑगस्टपासून रंगतोय भारत-श्रीलंका दौरा

भारतीय क्रिेकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा एक आठवडा अगोदरच सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यानंतर, या क्रिकेट सीरिजचा अधिकृत प्रसारक 'सोनी सिक्स'नं आपल्या कार्यक्रमात बदल करत टेस्ट सीरिजची वेळ बदलून एक आठवडा अगोदर म्हणजेच 12 ऑगस्ट केलीय.

Updated: Jul 8, 2015, 04:45 PM IST
12 ऑगस्टपासून रंगतोय भारत-श्रीलंका दौरा   title=

मुंबई : भारतीय क्रिेकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा एक आठवडा अगोदरच सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यानंतर, या क्रिकेट सीरिजचा अधिकृत प्रसारक 'सोनी सिक्स'नं आपल्या कार्यक्रमात बदल करत टेस्ट सीरिजची वेळ बदलून एक आठवडा अगोदर म्हणजेच 12 ऑगस्ट केलीय.

'सोनी सिक्स'नं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, भारत-श्रीलंके दरम्यान क्रिकेट सीरिज आता 12 ते 16 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. अगोदर जाहीर केल्याप्रमाणे हीच सीरिज 18 ऑगस्टपासून सुरू होणार होती. दरम्यान, याबद्दल अजून बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 
 
अशी असेल सीरिज :- 
पहिली टेस्ट : 12 ते 16 ऑगस्ट, गाले
दुसरा टेस्ट : 20 ते 24 ऑगस्ट, कोलंबो
तिसरी टेस्ट : 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, पाल्लेकेल

क्रिकेट श्रीलंकेला (एसएलसी) 18 ऑगस्टपासून टेस्ट मॅच सुरु करण्याविषयी शंका होती. कारण 17 ऑगस्टपासून इथं सार्वजनिक निवडणुकीला सुरुवात होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.