टी २० : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या ८० वर्षात पहिल्यांदा हिंदीमध्ये कॉमेंट्री

इतिहासात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या खेळप्रेमींना भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्याचे थेट प्रेक्षपण हिंदीत 

Updated: Jan 25, 2016, 05:55 PM IST
 टी २० : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या ८० वर्षात पहिल्यांदा हिंदीमध्ये कॉमेंट्री  title=

अॅडिलेड :  इतिहासात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या खेळप्रेमींना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ जानेवारी खेळण्यात येणाऱ्या टी-२० सामन्याचे थेट प्रेक्षपण हिंदीत ऐकू शकणार आहेत. 

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज जाहीर केले की भारत आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या केएफसी टी-२० सिरीजचे थेट प्रक्षेपण सीए लाइव्ह अॅप आणि क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू मध्ये हिंदीत दाखविण्यात येणार आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंडियन लिंक मीडिया ग्रूपचा नुकताच करार झाला. त्यानुसार ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रसारणाच्या ८० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कॉमेंट्री आता हिंदीत होणार आहे. 

 

ऑस्ट्रेलियात भारतीय समुदायाची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.