दुबई : 'आयसीसी वर्ल्ड इलेव्हन टीम'ची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये न्यूझीलंडच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टीममध्ये एकाही भारतीय खेळाडूला जागा मिळालेली नाही.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया विरूद्ध फायनलमध्ये हरलेल्या न्यूझीलंडच्या पाच खेळाडूंना या टीममध्ये जागा मिळालीय. मॅक्युलमकडे वर्ल्ड कपमधील त्याच्या आक्रमकतेमुळे आणि कॅप्टन म्हणून उत्कृष्टपणे पार पाडलेल्या कामगिरीमुळे या टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीय. मॅक्युलमने नऊ मॅचेसमध्ये १८८.५० च्या सरासरीने ३२८ रन्स केले होते.
या टीमची निवड आसीसीच्या एका पॅनलने खेळाडूंच्या वर्ल्ड कपमधील प्रदर्शनाच्या आधारावर केलीय. मॅक्युलमसोबत न्यूझीलंडच्या कोरी अॅंडरसन, ट्रेंट बोल्ट, मार्टिन गुप्टिल, डॅनियल विटोरी तसंच ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल, स्टीवन स्मिथ आणि मिशेल स्टार्क यांना या टीममध्ये जागा मिळालीय.
दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स आणि मॉर्नी मॉर्कल, श्रीलंकेचा विकेटकीपर-बल्लेबाज कुमार संघकारा यांनाही या टीममध्ये जागा मिळालीय. सहा मॅचमध्ये ४३३ रन्स बनवणाऱ्या झिम्बॉव्बेच्या ब्रँडन टेलरला बारावा खेळाडू म्हणून संधी मिळालीय.
भारतीय बॉलर उमेश यादव, मोहम्मद शमी आणि ऑफ स्पिनर आर अश्विनसुद्धा यांचीही नावं शर्यतीत होती. पण, सर्वांचीच निवड करणे शक्य नव्हते, असं पॅनलचे अध्यक्ष आणि आईसीसी महाप्रबंधक ज्यॉफ अलार्डिस यांनी म्हटलंय.
अशी आहे 'आईसीसी वर्ल्ड इलेव्हन २०१५ टीम'...
मार्टिन गुप्टिल - न्यूझीलंड
ब्रॅंडन मैकुलम - न्यूझीलंड (कॅप्टन)
कुमार संगकारा : श्रीलंका (विकेटकीपर)
स्टीवन स्मिथ : आस्ट्रेलिया
एबी डिविलियर्स : दक्षिण अफ्रीका
ग्लेन मॅक्सवेल : आस्ट्रेलिया
कोरी एंडरसन : न्यूझीलंड
डेनियल विटोरी : न्यूझीलंड
मिशेल स्टार्क : आस्ट्रेलिया
ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंड
मॉर्नी मॉर्कल : दक्षिण अफ्रीका
ब्रॅंडन टेलर : जिम्बाब्वे, (१२ खेळाडू)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.