मी शाहिदच्या मुलाची आई बनणार आहे - भारतीय मॉडेल

इंडियन मॉडेल अर्शी खानचं खळबळजनक वक्तव्य

Updated: Mar 15, 2016, 03:15 PM IST
मी शाहिदच्या मुलाची आई बनणार आहे - भारतीय मॉडेल title=

मुंबई : पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीसोबत अफेअरच्या चर्चांनंतर प्रसिद्धीस आलेली इंडियन मॉडेल अर्शी खान हिने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 

एका मुलाखतीत तिने म्हटलं की, ती शाहिदच्या मुलाची आई बनणार आहे आणि भोपाळमध्ये मुलाला जन्म देणार आहे. याआधी या मॉडेलने आफ्रिदीविषयी तिचं प्रेम जाहीर केलं होतं. 

अर्शी खान ही मुळची अफगाणिस्तानची आहे. काही दिवसांपूर्वी अर्शी आणि आफ्रिदी या दोघांनी दुबईमध्ये सोबत काही वेळ घालवल्याच्या ही चर्चा होत्या. आता तिने माझ्या गर्भात शाहिदचं मुल वाढतं असल्याचं वक्तव्य करुन पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा प्रयत्न केला आहे. 

पाहा व्हिडिओ (सौ. दैनिक भास्कर, फेसबूक)

 

मॉडल का दावा, 'आफरीदी के बच्चे की बनने वाली हूं मां'http://www.bhaskar.com/news-fbo/c-58-2928181-bp0828-NOR.html

Posted by Dainik Bhaskar on Monday, March 14, 2016