म्हणून भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीला गैरहजर

रियो ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचं सगळेच जण कौतुक करत आहेत. 

Updated: Aug 6, 2016, 01:20 PM IST
म्हणून भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीला गैरहजर  title=

रियो दी जानेरिओ : रियो ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचं सगळेच जण कौतुक करत आहेत. या शानदार ओपनिंग सेरेमनीत भारताचं नेतृत्व केलं. पम या सोहळ्यामध्ये भारतीय हॉकी टीम सहभागी झाली नव्हती. 

खराब किट्स मिळाल्याचा निषेध म्हणून हॉकी खेळाडू या सोहळ्यामध्ये सहभागी झाले नसल्याचं बोललं जातं होतं, पण यावर आता खुद्द केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ओपनिंग सेरेमनीच्या दुसऱ्याच दिवशी मॅच असल्यामुळे खेळाडूंनी विश्रांती घ्यायला प्राध्यान्य दिलं, म्हणून ते या सोहळ्याला आले नाहीत, असं गोयल म्हणाले आहेत.