...तर या मुलीसोबत सुरु आहे युवीचं डेटिंग!

टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. यावेळी तर तो बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानच्या एका सिनेमाच्या अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत डेटिंग करताना दिसतोय. 

Updated: Jun 20, 2015, 07:09 PM IST
...तर या मुलीसोबत सुरु आहे युवीचं डेटिंग! title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. यावेळी तर तो बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानच्या एका सिनेमाच्या अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत डेटिंग करताना दिसतोय. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 'बॉडिगार्ड' या सिनेमात दिसलेली हेजल आणि युवराज यांची मैत्री सध्या एका नात्याचं रुपांतर घेऊ पाहतेय. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच हेजल-युवराजची मैत्री झालीय. 

तसं पाहिलं तर बॉलिवूड आणि युवराजचं नातं काही त्याच्या चाहत्यांसाठी नवीन नाही. कधी किम शर्मा तर कधी दीपिका... किमसोबत युवराजचं नाव खुपच चर्चेत राहिलं. पण नंतर मात्र दोघांचं ब्रेक अप झालं. यानंतर त्याचं नाव दीपिकासोबतही जोडलं गेलं... आणि आता हेजल...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.