अँकरच्या शॉर्ट ड्रेसमुळे या क्रिकेटरने इंटरव्यूव्हला दिला नकार

साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर हाशिम आमला याने एका भारतीय महिला अँकरला मुलाखत देण्यास नकार दिला. अँकरने शॉर्ट ड्रेस घातला असल्यामुळे त्याने मुलाखतीसाठी नकार दिल्याचं बोललं जातंय. जर अँकरने ड्रेस बदलला तरच तो इंटरव्यूव्ह देईल असं देखील त्याने म्हटलं.

Updated: Feb 6, 2016, 10:00 AM IST
अँकरच्या शॉर्ट ड्रेसमुळे या क्रिकेटरने इंटरव्यूव्हला दिला नकार title=

नवी दिल्ली : साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर हाशिम आमला याने एका भारतीय महिला अँकरला मुलाखत देण्यास नकार दिला. अँकरने शॉर्ट ड्रेस घातला असल्यामुळे त्याने मुलाखतीसाठी नकार दिल्याचं बोललं जातंय. जर अँकरने ड्रेस बदलला तरच तो इंटरव्यूव्ह देईल असं देखील त्याने म्हटलं.

आमलाने ही अट यासाठी ठेवली कारण तो शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या महिलेच्या समोर बसणे तो धर्माच्या विरोधात मानतो. त्यानंतर आयोजकांनी त्याची अट मान्य केली. ही घटना डिसेंबर २०१५ ची आहे जेव्हा भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती.