ही आहे हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड?

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केल्यामुळे गोलंदाज हार्दिक पांड्या एकदम चर्चेत आला. पण, आता मात्र तो चर्चत आलाय त्याच्या कथित गर्लफ्रेंडमुळे. 

Updated: Mar 25, 2016, 02:13 PM IST
ही आहे हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड? title=

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केल्यामुळे गोलंदाज हार्दिक पांड्या एकदम चर्चेत आला. पण, आता मात्र तो चर्चत आलाय त्याच्या कथित गर्लफ्रेंडमुळे. 

मूळची जमशेदपूरची असलेली, पण, सध्या कलकत्यात वास्तव्यास असलेली २१ वर्षीय मॉडेल लीशा शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या बातम्या आता माध्यमांत आल्या आहेत. गेल्या एका वर्षापासून ते एकमेकांना ओळखतात अशी माहितीसुद्धा मिळत आहे. 

नुकतेच ते दोघे कोलकत्यातील ताज बंगाल येथील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. त्यावेळी उपस्थित लोकांनी लीशाला हार्दिकविषयी विचारलं असता 'तो लाखांत एक, शांत आणि परफेक्ट माणूस आहे', अशी प्रतिक्रिया तिने दिली. 

आम्ही फक्त मित्र असल्याचं लीशाने म्हटलं आहे. तिने त्याच्यासोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. आता मात्र तो फोटो हटवण्यात आला आहे.