मैदानावर भिडले मुंबई इडियन्सचे २ खेळाडू

दोन विरोधी टीममधील खेळाडू एकमेकांशी भिडतात हे आतापर्यंत आपण पाहिलं असेल पण एकाच टीममधले खेळाडू जेव्हा एकमेकांसोबत भिडतात तेव्हा... असंच घडलंय मुंबई इडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये.

Updated: May 1, 2016, 10:22 PM IST
मैदानावर भिडले मुंबई इडियन्सचे २ खेळाडू title=

पुणे : दोन विरोधी टीममधील खेळाडू एकमेकांशी भिडतात हे आतापर्यंत आपण पाहिलं असेल पण एकाच टीममधले खेळाडू जेव्हा एकमेकांसोबत भिडतात तेव्हा... असंच घडलंय मुंबई इडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये.

मुंबई आणि पुणे या दोन संघामधल्या मॅचमध्ये हरभजनच्या बॉलिंगवर सौरभ तिवारीने मारलेल्या शॉटवर रायडू फोर अडवण्यात अपयशी ठरला. त्यावर हरभजन सिंग भडकला आणि त्याच्या तोंडून असं काही निघालं ज्यामुळे रायडू याचा जाब विचारण्यासाठी हरभजनच्या दिशेने चालत आला.

हरभजनने मात्र परिस्थिती सांभाळत त्याला समजवलं पण रायडूने त्याच्या या कृतीवर नाराजी दर्शवली. त्यानंतर हरभजनला विकेट मिळाली आणि हरभजनने रायडूलाच जावून पहिली मिठ्ठी मारली. त्यामुळे या वादावर पडदा पडला. 

पाहा व्हिडिओ