टीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 'निवृत्त' स्मिथ पुन्हा मैदानावर परतणार

भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव एका खेळाडूच्या भलताच जिव्हारी लागलाय... हा खेळाडू आहे माजी कॅप्टन ग्रीम स्मिथनं... आणि याच पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या या खेळाडूनं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Dec 8, 2015, 02:50 PM IST
टीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 'निवृत्त' स्मिथ पुन्हा मैदानावर परतणार title=

दुबई : भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव एका खेळाडूच्या भलताच जिव्हारी लागलाय... हा खेळाडू आहे माजी कॅप्टन ग्रीम स्मिथनं... आणि याच पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या या खेळाडूनं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतलाय. 

नुकत्याच झालेल्या सीरिजमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला चार मॅचमध्ये ३-० अशा फरकानं हरवलंय. 'मास्टर्स चॅम्पियन्स लीग'मध्ये खेळण्याची तयारी करणाऱ्या स्मिथनं आपण आपल्या निवृत्तीचा निर्णय बदलण्यावर गंभीरतेनं विचार करत असल्याचं म्हटलंय. 

'द नॅशनल'शी बोलताना 'एमसीएल' हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करण्याचा मार्ग ठरू शकतो, असं स्मिथनं म्हटलंय. मी सध्या दुविधा मनस्थितीत आहे... मी सध्या ३४ वर्षांचा आहे... ३३ व्या वर्षीच मी निवृत्ती स्वीकारली. मी आणखी तीन-चार वर्ष खेळू शकतो का? हा प्रश्न मला सतत सतावतोय... आणि मला माहीत आहे की होय, मी खेळू शकतो. एमसीएलनंतर मी या प्रश्नावर उत्तर शोधून काढेन, असंही त्यानं म्हटलंय.  

७२ दिवसांच्या लांबलचक दौऱ्यानंतर त्यानं आपल्या टीमच्या सहकाऱ्यांना रिलॅक्स होण्याचा सल्ला दिलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.