लंडन : क्रिकेटचा देव आज मैदानावर पुन्हा दिसणार आहे आणि तोही चक्क क्रिकेट खेळताना. आज लॉर्डसवर एक ऐतिहासिक मॅच रंगणार आहे.लॉर्डसच्या २०० व्या वाढदिवसानिमित्त ही मॅच रंगणार आहे.
एमसीसी इलेव्हन आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड अशा नावाच्या दोन टीममध्ये ही मॅच होणार आहे आज होणा-या या मॅचमध्ये ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ टीमचा कॅप्टन असेल शेन वॉर्न आणि एमसीसी इलेव्हनचा कॅप्टन असेल सचिन तेंडुलकर. या मॅचच्या निमित्तानं सगळे दिग्गज क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थात लॉर्डसवर एकत्र आलेत.
एकाच फोटोत सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, ब्रायन लारा, एम मुरलीधरन, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, अॅडम गिलख्रिस्ट, राहुल द्रविड, डॅनियल वेटोरी आणि युवराज सिंह असा सेल्फीही त्यांनी यानिमित्तानं काढलाय. केविन पीटरसननं ही सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘द ओरिजनल सेल्फी’ म्हणून पोस्ट केलीय. पण, हीच सेल्फी ‘महासेल्फी’ ठरतेय. क्रिकेट जगतातले एवढे सगळे तारे यापूर्वी कधीच एकत्र दिसले नव्हते. त्यामुळेच केवीननं हा फोटो शेअर केला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.