क्रिसची धडाकेबाज खेळी; बंगुळरूनं कोलकातावर केली मात

धडाकेबाज बॅटसमन क्रिस गेल शंभरी पार करता करता राहिला पण, आपल्या तडाखेबाज खेळीनं त्याच्या टीमला मात्र विजयप्राप्ती झालीय.

Updated: Apr 12, 2015, 02:56 PM IST
क्रिसची धडाकेबाज खेळी; बंगुळरूनं कोलकातावर केली मात title=

कोलकाता : धडाकेबाज बॅटसमन क्रिस गेल शंभरी पार करता करता राहिला पण, आपल्या तडाखेबाज खेळीनं त्याच्या टीमला मात्र विजयप्राप्ती झालीय.

बंगळुरूनं तीन विकेटस राखत कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. ५६ बॉल्समध्ये ९६ रन्सची तुफानी खेळी खेळत क्रिस गेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. 

क्रिस गेलनं मात्र इडन गार्डनवर उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच टाळ्या वाजवण्यास भाग पाडलं. आपल्या खेळीत त्यानं सात चौकार आणि सात सिक्सर ठोकले.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.