कोलकाता: इंडियन प्रिमियर लीगच्या आठव्या सिझनच्या पहिल्या मॅचमध्ये एक घटना घडली आणि सगळीकडे हशा पिकला. गौतम गंभीरची बॅट खेळता खेळता अचानक मधून तुटली. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केकेआरसोबत ही आश्चर्यकारक घटना घडली.
कोलकाता नाइट रायडर्सची टीम मुंबई इंडियन्सचं १६९ लक्ष्याचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरली. मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आर. विनय कुमार बॉलिंग करत होते. जसा विनयनं पहिला बॉल टाकला तेव्हा गंभीरनं बॅटिंग करायला बॅटनं बॉल ठोकला आणि त्याची बॅट तुटून दोन तुकड्यांमध्ये वेगळी झाली. गंभीरच्या हातात फक्त बॅटचा धरण्याचा भाग उरला. यानंतर याच ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विकेटकीपर आदित्य तारेनं गंभीरची कॅच सोडली.
काल खेळली गेलेली ही पहिली मॅच कोलकाता नाइट रायडर्सनं जिंकली. कॅप्टन गौतम गंभीरची हाफसेंच्युरी आणि तरूण खेळाडू सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीनं सध्याची चॅम्पियन टीम केकेआरनं मुंबई इंडियन्सला सात विकेटनं हरवलं.
गंभीरनं ४३ बॉल्समध्ये ५७ रन्स केले. त्यानं मनीष पांडेसोबत २४ बॉल मध्ये ४० रन्स सह दुसऱ्या विकेटसाठी ८५ रन्सची पार्टनरशीर केली. आयपीएलची उद्घाटन मॅच जिंकून केकेआरनं दोन अंक मिळवलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.