स्टम्पला बॉल लागला तरी मनिष पांडे नॉट आऊट

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा विजय झाला आहे. रोमहर्षक अशा या मॅचमध्ये काही फनी मुमेंट्सही पाहायला मिळाल्या.

Updated: Jan 30, 2017, 06:08 PM IST
स्टम्पला बॉल लागला तरी मनिष पांडे नॉट आऊट title=

नागपूर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा विजय झाला आहे. रोमहर्षक अशा या मॅचमध्ये काही फनी मुमेंट्सही पाहायला मिळाल्या. मनिष पांडे बॅटिंग करत असताना बेन स्टोक्सचा बॉल स्टम्पला लागला, त्यामुळे स्टम्पला लावण्यात आलेले लाईटही पेटले पण बेल्स न पडल्यामुळे मनिष पांडेला जीवदान मिळालं. आयसीसीच्या नियमांनूसार बॉल स्टम्पला लागल्यावर बेल्स पडल्या तरच खेळाडूला आऊट दिलं जातं.