टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड

टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.

Updated: May 6, 2015, 03:20 PM IST
टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड title=

मुंबई: टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.

सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रवि शास्त्री यांच्या नावांची कोच पदासाठी मीडियात चर्चा सुरू आहे. राहुल द्रविडला याबाबत प्रश्न विचारला असता, गरज पडल्यास याबाबत नक्की विचार करेल असे त्याने सांगितले.

मागील १५ वर्षांपासून भारतीय टीमच्या कोच पदाची कमान विदेशींच्या हाती आहे. ग्रेग चॅपल, जॉन राइट, गॅरी कर्स्टन आणि डंकन फ्लेचर हे गेल्या १५ वर्षांपासून टीम इंडियाचे कोच आहेत. मात्र यावेळी भारताचा कोच भारतीय होण्याची शक्यता आहे. द्रविडने आपण कोच बनू शकतो असे संकेत दिले आहेत.

काही महिन्यांपू्र्वी द्रविडला कोच बनण्याबाबत प्रश्न विचारला असता, आपल्याकडे फुल टाईम जॉबसाठी वेळ नसल्याचे त्याने सांगितले होते. मात्र आता त्याने गरज पडल्यास याबाबत विचार करेल असे सांगितले आहे. सध्या मी राजस्थान रॉयलसाठी जे करतोय त्यात आनंदी आहे, असेही त्याने सांगितले.

बीसीसीआय गांगुली, तेंडुलकर, द्रविड आणि शास्त्री यांचा कोच पदासाठी विचार करत आहे, यावर द्रविडने उत्तर दिले की, तुम्हा मीडियावाल्यांकडे माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. याबाबत मला माहिती मिळाल्यास मी याबाबत प्रतिक्रिया देईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.