लंडन : कोलंबियाची पॉप स्टार शकीरा हिनं यंदाच्या फिफा वर्ल्डकप समारोप सोहळ्यात आपल्या दमदार परफॉर्मन्सनं सगळ्यांनाच भुरळ पाडली... याच टूनार्मेंटनं आपलं संपूर्ण आयुष्यच बदलल्याचं ती म्हणतेय. कारण, 2010 मध्ये वर्ल्डकप दरम्यान शकीरा आणि तिचा पती गेरार्ड पिक यांची भेट झाली होती.
‘शी वोल्फ’मधून चर्चेत आलेली 37 वर्षीय गायिका शकीरा आणि स्पॅनिश खेळाडू गेरार्ड पिक या जोडप्याला मिलान नावाचा एक 18 महिन्यांचा मुलगाही आहे.
‘2010 साली वाका वाका, टाईम फॉर आफ्रीका या गाण्यासाठी मला साईन केलं गेलं नसतं तर आम्ही कधीच एकमेकांना भेटलो नसतो’ असं शकीरानं म्हटलंय.
‘वर्ल्ड कप दरम्यानंच मला माझं प्रेम भेटलं होतं... मी त्या वर्ल्डकप दरम्यान हे सगळं घडलं नसतं तर आज आमचा मुलगा मिलानही इथं नसता’, असं शकीरानं म्हटलंय.
शकीरा हिनं यंदा तिसऱ्यांदा वर्ल्डकप सोहळ्यात थिरकत केलीय. यापूर्वी, 2010 साली दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप समारोप सोहळ्यात आणि 2006 मध्ये जर्मनीत आयोजित केलेल्या सोहळ्यात ती थिरकताना दिसली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.