धोनीच्या 'झिवा'ची पहिली झलक, धोनीनं शेअर केला फोटो

भारताचा सुपरकूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची चिमुकली 'झिवा'चा पहिला फोटो धोनीने सोशल साइटवर शेअर केला आहे. त्या फोटोत तो स्वत: त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत दिसत आहे. 

Updated: Apr 18, 2015, 06:08 PM IST
धोनीच्या 'झिवा'ची पहिली झलक, धोनीनं शेअर केला फोटो title=

नवी दिल्ली: भारताचा सुपरकूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची चिमुकली 'झिवा'चा पहिला फोटो धोनीने सोशल साइटवर शेअर केला आहे. त्या फोटोत तो स्वत: त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत दिसत आहे. 

क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान 'झिवा'चा जन्म झाला होता. मात्र वर्ल्ड कपच्या व्यस्ततेमुळे धोनीने तब्बल दीड महिन्यानंतर आपल्या चिमुकलीला पाहिलं होतं.
 
याआधी धोनीची पत्नी साक्षीने 'झिवा'चा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला होता. त्यात 'झिवा'चा फक्त हातच दिसत होता. मात्र धोनीने आता स्वत: आपल्या मुलीचा फोटो त्याच्या चाहत्यासाठी शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात 700 पेक्षा जास्त वेळा हा फोटो शेअर करण्यात आला. 

धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.