शिखरच्या हातातून सुटला कॅच तरी फलंदाज बाद!

 भारत विरूद्ध अफगाणिस्तानच्या सराव सामन्यात काल एक जबरदस्त कॅच पकडण्यात आला. तुम्ही ही मॅच पाहिली नसेल तर खास तुमच्यासाठी ही बातमी आहे.  काल भारताने ३६४ धावांची मजल मारली त्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ २११ धावा करता आल्या. 

Updated: Feb 11, 2015, 06:44 PM IST
 शिखरच्या हातातून सुटला कॅच तरी फलंदाज बाद! title=

अॅडलेड :  भारत विरूद्ध अफगाणिस्तानच्या सराव सामन्यात काल एक जबरदस्त कॅच पकडण्यात आला. तुम्ही ही मॅच पाहिली नसेल तर खास तुमच्यासाठी ही बातमी आहे.  काल भारताने ३६४ धावांची मजल मारली त्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ २११ धावा करता आल्या. 

पण या सामन्यात एक रोमांचक क्षण अनुभवायला मिळाला. अफगाणिस्तान फलंदाजी करताना २१ व्या षटकात शिखर धवन आणि उमेश यादव या जोडगोळीने एक शानदार कॅच पकडला. यात अद्भूत समन्वय पाहायला मिळाले. अफगाणिस्तानच्या फलंदाज उस्मान गनी ४४ धावांवर खेळत असताना रविंद्र जडेजाच्या चेंडूवर त्याने फटका लगावला. हा फटका हवेत गेला त्याच्या मागे उलट्या दिशेने शिखर धवन पळत गेला. आणि चेंडूच्या दिशेने उमेश यादव पळत होता. कॅच पकडण्यासाठी त्याने उलट्या दिशेने डाइव्ह घेतली. त्याच्या हातात चेंडू आलाही पण अखेरच्या क्षणीच जमिनीला हात आदळून चेंडू निसटला त्याने दुसऱ्या हाताने तो पकडण्याच प्रयत्न केला पण तो आला नाही मग त्याने तिसऱ्या प्रयत्नात चेंडू उडवला. आणि समोरून येणाऱ्या उमेश यादवने हा झेल अलगद पकडला. 

पाहा व्हिडिओ : शानदार कॅचचा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.