षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय. 

Updated: Jan 21, 2017, 09:40 AM IST
षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड title=

कटक : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय. 

दुसऱ्या वनडे षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडच्या संघाला १० टक्के दंड ठोठावण्यात आलाय. त्याचप्रमाणे इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनलाही २० टक्के दंड ठोठावण्यात आलाय. 

आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील रेफ्री अँडी क्राफ्ट यांनी इयान मॉर्गन यांच्या संघाला निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याच्या कारणावरुन हा दंड ठोठावलाय. 

आयसीसीचे कलम २.५.१ उल्लंघन केल्याप्रकरणी कर्णधार मॉर्गनच्या मानधनातून २० टक्के रक्कम कापण्यात येणार तर अन्य खेळाडूंच्या मानधनातून १० टक्के रक्कम कापली जाईल.