जोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल. 

Updated: Jan 28, 2016, 05:48 PM IST
जोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये title=

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल. 
मेलबोर्नमध्ये झालेल्या या सेमी फायनलमध्ये जोकोविच पहिल्यापासूनच आघाडीवर होता. पहिल्या सेटमध्ये त्यानं  6-1 आणि 6-2 नं खिशात टाकला. पण त्यानंतर मात्र फेडररनं कमबॅक करत तिसरा सेट 6-3 नं जिंकला. पण चौथ्या सेटमध्ये मात्र पुन्हा तसाच करिश्मा फेडररला दाखवता आला नाही, आणि त्याचं ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये खेळायचं स्वप्न भंगलं.