धोनीनं तडकाफडकी दिला राजीनामा

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आम्रपाली या रियालिटी इस्टेट कंपनीच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर पदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Apr 15, 2016, 09:52 PM IST
धोनीनं तडकाफडकी दिला राजीनामा title=

मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आम्रपाली या रियालिटी इस्टेट कंपनीच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर पदाचा राजीनामा दिला आहे.

काय आहे नेमका वाद ?

धोनी हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून आम्रपालीचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होता. पण आम्रपालीच्या नोएडामधल्या सफायर प्रोजेक्टची कामं अपूर्ण असल्यामुळे रहिवासी नाराज झाले होते. या रहिवाशांनी ट्विटरवर धोनीच्या राजीनाम्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर धोनीनं हा निर्णय घेतला आहे. 

या अपूर्ण कामांबाबत मी बिल्डरशी बोलीन आणि त्यांनी दिलेली आश्वासन पूर्ण करायला सांगीन, अशी प्रतिक्रिया धोनीनं मागच्या आठवड्यात दिली होती. दरम्यान पुढच्या तीन महिन्यांमध्ये सगळी काम पूर्ण करण्याचा दावा आम्रपाली ग्रुपनं केला आहे. 

धोनीचं नाव खराब होऊ नये म्हणून

धोनी हा आता आमचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर नाही. आम्रपालीमुळे त्याच्या प्रतिमेवर डाग पडू नयेत, म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया आम्रपालीचे चेअरमन आणि एमडी अनिल शर्मा यांनी दिली आहे.