म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

Updated: May 23, 2016, 04:34 PM IST
म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती  title=

मुंबई : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यामध्ये तीन वनडे आणि तीन 20 मॅच असणार आहेत. या दौऱ्यात भारताचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडेच देण्यात आलं आहे.

महेंद्रसिंग धोनी गेल्या वर्षभरापासून सातत्यानं क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे या दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात येईल, असं बोललं जात होतं. पण निवड समितीनं मात्र असा कोणताही निर्णय घेतला नाही. 

झिम्बाब्वेचा हा दौरा अत्यंत छोटा आहे. यानंतर भारतीय टीम थेट ऑक्टोबरमध्ये न्यूझिलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये तीन टेस्ट आणि पाच वनडेचा समावेश आहे. 

या वर्षामध्ये न्यूझिलंडविरुद्धची वनडे सीरिज सोडली तर भारत तब्बल 13 टेस्ट खेळणार आहे. धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. 

त्यामुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीला चार ते पाच महिन्यांची विश्रांती मिळू शकते. म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती न देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतल्याचं बोललं जात आहे.