नवी दिल्ली : भारताला सर्वात आधी अभ्यास सामन्यात ऑस्ट्रेलियाने १०६ धावांनी हरवलं. आता भारताला अफगाणिस्तानसोबत आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. या आधी महेंद्र सिंह धोनी पहिल्या ११ खेळाडू निवडणार आहे, यात स्पिनर्सचा जास्त समावेश असण्याची शक्यता वाढली आहे.
धोनीने सामन्यानंतर सांगितलं, आमच्यासाठी हा सामना कठीण आहे. जेव्हा बॅटसमन चालतात, तेव्हा बॉलर चालत नाहीत, आणि जेव्हा बॉलर चालतात, तेव्हा बॅटसमन चालत नाहीत.
आम्हाला यात सुधार करावा लागेल, आम्हाला, टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तान टीमचा करायचा आहे, त्याआधी एक अभ्यास सामना आहे, यात शेवटचे अकरा खेळाडू ठरवणे महत्वाचे आहे, तसेच या सामन्यात अनेक सकारात्मक गोष्टी देखिल समोर आल्या आहेत.
टीममधील अकरा खेळाडू निवडण्यासाठी धोनी तू कोणता निकष ठेवशील असा प्रश्न विचारल्यावर धोनी उत्तर देतांना म्हणाला, जर स्पिच असली तर चेंडू वर येण्यासाठी आम्हाला स्पिनर्स वापरावे लागतील. ही एक मोठी टुर्नामेंट मोठी आहे, यात तिच टीम योग्य ते प्रदर्शन करते, वेगाने खालून वरपर्यंत जाते.
धोनी आज पहिल्याच बॉलवर आऊट झाला, त्यावर धोनी म्हणाला, "मी माझा शॉट खेळला कारण मोठी धावसंख्या होती, मला माहित नव्हतं की चेंडू सरळ मिशेल स्टार्कजवळ जाईल".
ऑस्टेलियन टीमचा कॅप्टन जार्ज बेलीने टीमचं कौतुक करतांना म्हटलं आहे, "आम्ही खूप चांगलं प्रदर्शन केलं, आम्ही आणखी चांगलं खेळू, आम्ही एवढे विकेट गमवायला नको होते."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.