धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा

सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.

Updated: Dec 20, 2016, 02:17 PM IST
धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा title=

चेन्नई : सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.

कोहलीचे हे नेतृत्वगुण पाहता वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनीला कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो, असे मत भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी व्यक्त केलेय.

विराट कसोटीमध्ये कर्णधार तसेच फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करतोय. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या वर्षात त्याने कसोटीमध्ये तब्बल हजाराहून अधिक धावा केल्या. 

त्याच्या कामगिरीचा आलेख पाहता कोहलीच्या नेतृत्त्वाखाली धोनीला खेळण्यास हरकत नाही. दरम्यान, याबाबतचा निर्णय निवड समितीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर घेतला जावा. धोनी जर 2019च्या वर्ल्डकपपर्यंत खेळू शकणार नाही असे निवड समितीला वाटत असेल तर त्यांनी हे नेतृत्त्व कोहलीकडे सोपवावे, असे ते म्हणाले.