धनराज पिल्ले टेबल टेनिस संघाचे मालक

भारताचे माजी ऑलिंपियन हॉकीपटू धनराज पिल्ले मुंबई सुपर टेबल टेनिस लीगमधील संघाचे सहकारी मालक झाले आहेत. जून महिन्यात एनएससीआयमध्ये झालेल्या लिलावात पिल्ले यांनी ब्लेजिंग बॅशर्स हा संघ खरेदी केला. संघाची मालकी घेतल्याने स्पर्धेत अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होता आले असे त्यांचे म्हणणे आहे.

Updated: Jul 11, 2016, 08:09 PM IST
धनराज पिल्ले टेबल टेनिस संघाचे मालक title=

मुंबई : भारताचे माजी ऑलिंपियन हॉकीपटू धनराज पिल्ले मुंबई सुपर टेबल टेनिस लीगमधील संघाचे सहकारी मालक झाले आहेत. जून महिन्यात एनएससीआयमध्ये झालेल्या लिलावात पिल्ले यांनी ब्लेजिंग बॅशर्स हा संघ खरेदी केला. संघाची मालकी घेतल्याने स्पर्धेत अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होता आले असे त्यांचे म्हणणे आहे.

 लिलावात 2013 चे पुरूष एकल चॅम्पियन सानिल शेट्टी यांच्यावर सर्वाधिक 35500 रूपयांची बोली लावण्यात आली होती. तसेच महिलांमध्ये दिव्या देशपांडे यांच्यासाठी सर्वाधिक 23500 रूपयांची बोली लावण्यात आली होती. 7 ते 10 जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पडली.