भारत-वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णीत

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आलेला सराव सामना अनिर्णीत राहिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९३ षटकांत सहा बाद २५८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. 

Updated: Jul 11, 2016, 05:06 PM IST
 भारत-वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णीत title=

बॅसेटर : भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आलेला सराव सामना अनिर्णीत राहिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९३ षटकांत सहा बाद २५८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. 

 त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस़्ट इंडिजने ८७ षटके खेळून काढताना सात बाद २८१ धावा केल्या. 

भारताकडून लेग स्पिनर अमित मिश्राने जबरदस्त गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. मिश्राव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.