टूर्नामेंटसाठी जीव लावला होता, पराभवानंतर डिव्हिलिअर्सची प्रतिक्रिया

न्यूझीलंड विरूद्ध रोमांचक सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि त्याचा साथीदार मोर्ने मॉर्केलचे अश्रू थांबता थांबत नव्हते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन म्हणाला की, मी दु:खी नाहीय, कारण टूर्नामेंटसाठी मी आपला जीव लावला होता. 

Updated: Mar 24, 2015, 07:02 PM IST
टूर्नामेंटसाठी जीव लावला होता, पराभवानंतर डिव्हिलिअर्सची प्रतिक्रिया title=

ऑकलँड: न्यूझीलंड विरूद्ध रोमांचक सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि त्याचा साथीदार मोर्ने मॉर्केलचे अश्रू थांबता थांबत नव्हते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन म्हणाला की, मी दु:खी नाहीय, कारण टूर्नामेंटसाठी मी आपला जीव लावला होता. 

डिव्हिलिअर्सनं म्हटलं, 'क्रिकेटमधील ही शानदार मॅच होती. मी आपल्या आयुष्यात आजच्या इतके उत्साहपूर्ण प्रेक्षक बघितले नाही. सर्वश्रेष्ठ टीम विजयी झाली. आम्ही आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. कोणतंही दु:ख नाहीय. पण हे वेदनादायक आहे. यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल. वाईट हे आहे की, आम्ही स्वत: साठी नाही खेळत '

तो पुढे म्हणतो, आम्ही आपल्या देशवासियांसाठी खेळतो. मला आशा आहे की, त्यांनाही आमच्यावर अभिमान असेल. आम्ही चांगलं प्रदर्शन केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.