छातीवर बॉल लागल्यानं ब्रिटिश तमिळ क्रिकेटपटूचा मृत्यू

लंडनमधील ब्रिटीश तमिळ लीग या क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान एक दुख:द घटना घडलीय. या टुर्नामेंट दरम्यान एका मॅचमध्ये खेळताना बावलन पद्मनाथन या बॅटसमनच्या छातीवर वेगानं आलेला बॉल आदळला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

Updated: Jul 7, 2015, 10:31 PM IST
छातीवर बॉल लागल्यानं ब्रिटिश तमिळ क्रिकेटपटूचा मृत्यू  title=

लंडन: लंडनमधील ब्रिटीश तमिळ लीग या क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान एक दुख:द घटना घडलीय. या टुर्नामेंट दरम्यान एका मॅचमध्ये खेळताना बावलन पद्मनाथन या बॅटसमनच्या छातीवर वेगानं आलेला बॉल आदळला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्याच्यावर अॅंब्युलन्समध्ये उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते प्रयत्न अपुरे पडले आणि मणिपाय पॅरीश स्पोर्ट्स क्लब या टिमच्या या 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

24 वर्षांचा पद्मनाभन हा ब्रिटिश तमिळ लीगमध्ये मनीपाय पॅरिश स्पोर्टस क्लबकडून खेळायचा. रविवारच्या सामन्यात पद्मनाभनच्या छातीत चेंडू आदळल्यावर तो काही क्षणातच खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. पण तरीही पद्मनाभन वाचवण्यात अपयश आलं.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातल्या शेफिल्ड शिल्ड सामन्यातही घडलेल्या दुर्दैवी अपघातानं क्रिकेटचं जग हादरलं होतं. त्या अपघातात ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज फिल ह्यूजच्या डोक्यावर चेंडू आदळून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोलकात्यातल्या स्थानिक सामन्यात ईस्ट बंगालच्या अंकित केसरीचा आपल्या सहकारी क्षेत्ररक्षकाशी झालेल्या टकरीत मृत्यू झाला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.