सुरेश रैना असणार नव्या टीमचा कॅप्टन

सुरेश रैनाकडे नव्या टीमची धुरा.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 2, 2016, 05:37 PM IST
सुरेश रैना असणार नव्या टीमचा कॅप्टन title=

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम आयपीएल मधून निलंबित झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू हे वेगवेगळ्या टीममध्ये वाटले गेले.

आयपीएल ९ मध्ये राजकोट फ्रेंचायजीची नवी टीम गुजरात लायन्स या नावाने ओळखली जाणार आहे. अनेक वर्षांपासून चेन्नईकडून खेळणाऱ्या सुरेश रैना याच्याकडे या संघाची धुरा सोपवण्यात आली असून ब्रॅड हॉज हे या टीमचे कोच असणार आहेत. 

रैनाने म्हटलं आहे की, हे वर्ष संघर्षपूर्ण राहणार आहे. मला आशा आहे की गुजरातच्या या टीमला गुजरातच्या लोकांचं खूप समर्थन मिळेल. 

रविंद्र जडेजा, ब्रँडन मैक्यूलम, डेन ब्रॅवो, जेम्स फॉकनर हे ऑलराऊंडर या टीममध्ये असणार आहेत.