भारतीय महिला संघाने पहिल्या T-20मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले

 अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकीत करीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने पराभूत केले. 

Updated: Jan 26, 2016, 03:26 PM IST
भारतीय महिला संघाने पहिल्या T-20मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले  title=

अॅडिलेड :  अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकीत करीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने पराभूत केले. 

१४१ धावांचे लक्ष भारतीय महिला संघाने १९ षटकातच पूर्ण केले.  लक्ष्याचा पाठलाग करताना इतकी मोठी धाव संख्या त्यांनी पहिल्यांदा चेस करताना रेकॉर्ड केला आहे. 

यापूर्वी भारतीय महिला संघाने १२८ धावाचे आव्हान पार केले होते. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात ऑस्ट्रेलियाला झटका बसला. त्यानंतर इतर फलंदाजांनी टीम सांभळली. मूनीने ३६ धावा केल्या. १६ व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ८१/५ होती. त्यानंतर एलेक्स ब्लॅकवेल आणि एलिसा हिली यांनी धावसंख्या १४० पर्यंत पोहचवली. हिलीने १४ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. 

भारताकडून पूनम यादवने २ , झूलन गोस्वामी, शिखा पांडे आणि अंजली पाटील प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवातही चांगली झाली नाही. कर्णधार मिताली राज केवळ ४ धावांवर बाद झाली. दुसऱ्या विकेटसाठी कृष्णमूर्ती आणि स्मृतीने जलद ५५ धावा केल्या. १४ ओव्हरमध्ये भारत ९१/४ होत्या. ३६ चेंडूत ५० धावांची आवश्यकताा होती. त्यावेळी हरमनप्रीत कौरने ३१ चेंडूत ४६ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. 

आता तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये भारत १-० ने आघाडीवर आहे. हरमनप्रीत कौर हिला प्लेअर ऑफ द मॅच निवडण्यात आले. 

स्कोरकार्ड:

ऑस्ट्रेलिया: 140/5 (हिली 41*, मूनी 36, पूनम 2/26)

भारत: 141/5 (हरमनप्रीत 46, कृष्णमूर्ति 35)