नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगविरुद्ध त्याच्या भावी वधूने तक्रार दाखल केलीये. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप अशपाल कौर हिने केलाय.
अशपाल कौर आणि सरदार यांची पहिली भेट २०१२ लंडन ऑलिंपिकदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघेही एकत्र होते. ऑगस्ट २०१४मध्ये दोघांनी साखरपु़डा केला होता.
अशपाल कौरही हॉकी खेळाडू आहे. ती इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघात खेळली आहे. सरदार सध्या ऑलिपिंकच्या तयारीत व्यस्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरदारविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत.
काही दिवसांपूर्वीच सरदार सिंगने हॉकी इंडियाचे समर्थन करताना पाकिस्तानी खेळाडूंना हॉकी इंडिया लीगमध्ये खेळायचे असल्यास त्यांनी माफी मागावी असे विधान केले होते.