रांची: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नव्या वादात सापडला आहे. रांचीमधल्या काही नागरिकांनी धोनीविरोधात झारखंडचे महसूल मंत्री अमर कुमार बाऊरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
धोनीच्या रांचीमध्ये असलेल्या घरातल्या स्विमिंग पूलचा हा वाद आहे. रांचीच्या हरमूमध्ये पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. त्यातच धोनीच्या स्विमिंग पूलसाठी रोज 15 हजार लिटर पाणी दिलं जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांना प्यायला पाणी नसताना धोनीच्या स्विमिंग पूलसाठी पाण्याची नासाडी का होत आहे, असा सवालही या नागरिकांनी उपस्थित केला आहे. धोनीच्या जवळच्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. धोनी जेव्हा घरी येतो तेव्हाच स्विमिंग पूलमध्ये पाणी टाकलं जातं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.