बंगलुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने षटकार मारून षटकारांचा ५००चा आकडा पूर्ण केला. सर्वाधिक षटकार मारणार तो जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेलने १० धावा केल्या त्यात एका षटकाराचा समावेश होता. या षटकार त्याच्या टी-२० कारकिर्दीतला ५००वा षटकार होता.
हा क्रिस गेलचा २०१वा टी-२० सामना होता. या यादीत किरॉन पोलार्ड ३४८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेलने आयपीएलमध्येही २०० षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.
क्रिस गेलने २६९ एकदिवसीय सामन्यात ९२२१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात गेल २३८ षटकारांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी ३५१ षटकारांसह पहिल्या स्थानावर तर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या २७० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.