चीअरलीडर्स म्हणतात गेल, डिविलियर्स नको रे बाबा!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) मध्ये खेळत असलेल्या ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांच्यापासून चीअरलीडर्स खूप त्रस्त झाल्या आहेत. याचं कारण काही दुसरं नाही तर त्यांची दमदार बॅटिंग आहे. 

Updated: May 11, 2015, 11:06 AM IST
चीअरलीडर्स म्हणतात गेल, डिविलियर्स नको रे बाबा! title=

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) मध्ये खेळत असलेल्या ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांच्यापासून चीअरलीडर्स खूप त्रस्त झाल्या आहेत. याचं कारण काही दुसरं नाही तर त्यांची दमदार बॅटिंग आहे. 

आयपीएल मॅच दरम्यान खेळाडूंपासून क्रिकेट फॅन्सपर्यंतचं सर्वांचं मनोरंजन करणार्या चीअरलीडर्स ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्सच्या आक्रमक बॅटिंगमुळे चांगल्याच त्रस्त झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना टुर्नामेंट मध्येच सोडून जायची इच्छा आहे. कारण जेव्हा ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स बॅटिंग करत असतात, ते त्या खूप विचारात असतात. कारण हे दोन्ही बॅट्समन असे आहेत की ते लागोपाठ षटकार आणि चौकार मारत असतात. 

अशात त्यांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यांना आरसीबीची टीम सोडून किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये जावू इच्छितात. चीअरलीडर्स रंग-बिरंगी आणि शॉर्ट स्कर्ट आणि टीमची जर्सी घालून आपल्या टीमद्वारे लागलेल्या षटकार, चौकार आणि विकेट घेतल्यानंतर रॅम्पवर येवून दर्शकांचं मनोरंजन करतात. 

ख्रिस गेलनं मागील मॅचमध्ये पंजाबविरुद्ध ५७ बॉल्समध्ये ११७ रन्सची दमदार बॅटिंग केली होती. ज्यात ७ चौकार आणि १२ लांबलचक षटकारांचा समावेश होता. तर एबी डिविलियर्सनं ५९ बॉल्समध्ये १३३ रन्स केले. ज्यात १९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.