भारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.

Updated: Feb 15, 2015, 11:31 PM IST
भारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल title=

अॅडलेड : कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मागील अडीच महिन्यापासून टीम इंडिया आहे, यात हा पहिला विजय आहे, त्यामुळे मायदेशी आणि परदेशी विजयात तुलना नको, अशी विनंतीही त्याने फॅन्सना केली आहे.

पाकिस्तान विरूद्ध  वर्ल्डकमध्ये सहा सलग विजयांवर बोलतांना धोनी म्हणाला, "रेकॉर्ड चांगला आहे, मी याबाबतीत जास्त काही बोलणार नाही, कारण खेळात हार जीत होत राहते, हरण्याची वेळ आपल्यावरही येऊ शकते. मग ती वेळ आताच्या वर्ल्डकपमध्ये असेल, नाहीतर चार वर्ल्डकप नंतर. आपल्याला गर्व हाच आहे की, आपण हे पुन्हा एकदा करून दाखवलं, आणि दुसरं असं की, पाकिस्तान विरूद्ध खेळतांना भारताचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिला आहे".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.