...आज चेन्नई मॅक्क्युलमशिवाय खेळणार!

चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स या टीम्सदरम्यान आज पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे. मात्र, अंकतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईला आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज ब्रॅन्डन मॅक्क्युलमची कमतरता भासू शकते. 

Updated: May 19, 2015, 05:16 PM IST
...आज चेन्नई मॅक्क्युलमशिवाय खेळणार! title=

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स या टीम्सदरम्यान आज पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे. मात्र, अंकतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईला आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज ब्रॅन्डन मॅक्क्युलमची कमतरता भासू शकते. 

ब्रॅन्डन मॅक्क्युलम इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरिज खेळण्यासाठी न्यूझीलंड टीमसोबत रवाना झालाय. त्यामुळे आज मॅक्क्युलमच्या जागी मायकल हसी खेळताना दिसणार आहे. उल्लेखनीय म्हणजे 'आयपीएल-८' मध्ये मॅक्क्युलमनं चेन्नईकडून सर्वाधिक म्हणजेच ४३६ धावा केल्या आहेत. 

'या सामन्यात मॅक्क्युलमची उणीव जाणवेल... तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र मॅक्क्युलमच्या अनुपस्थितीत जलद गतीने रन बनवण्याची जवाबदारी रैनाची असणार आहे' असं चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी म्हटलंय. 

मुंबई आणि चेन्नई या सत्रात दोनदा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, त्यात दोघांनीही एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्हीही टीम विजयाच्या समान दावेदार मानल्या जात आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.