मुंबई : क्रिकेटच्या नियमांमध्ये लवकरच बदल बघायला मिळणार आहेत. बॅट्समनच्या बॅटच्या आकारावर निर्बंध येणार आहेत. नव्या नियमांनुसार बॅट्समन हा जास्तीत जास्त १०८ एमएम रूंद, ६७ एमएम खोल आणि ४० एमएमच्या एज वापरू शकतो.
सध्याच्या नियमांनुसार बॅटच्या आकाराबाबत कोणतेही नियम नव्हते. यामुळे नवं तंत्रज्ञान वापरून बॅट्समन मोठ्या आकाराच्या बॅट वापरत होते. क्रिकेटमध्ये वारंवार होणाऱ्या मोठ्या स्कोअरसाठी या बॅटना जबाबदार धरण्यात येतं. अनेक बॉलर्सकडूनही या मोठ्या बॅटवर आक्षेप घेण्यात आले, तसंच नियम बदलण्याचीही मागणी करण्यात आली होती.