मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (आयसीसी) यांच्यामध्ये विवाद सुरु झाला आहे. क्रिकेट बोर्ड भेदभाव करत असल्याच्या प्रकरणात बीसीसीआयने आयसीसीला धमकावलं आहे की, ते चँपियंस ट्रॉफी २०१७मधून नाव परत घेवू. काही दिवसापूर्वी आयसीसीच्या फायनंस कमेटीच्या बैठकीत बीसीसीआयला सहभागी नव्हतं केलं गेलं. यानंतर या वादाला सुरुवात झाली.
बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये वाद वाढत चालला आहे. बीसीसीआयचे सेक्रेटरी अजय शिर्के यांनी याला बीसीसीआयचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा बैठकींमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि या बैठकीत भारताचा प्रतिनिधी नसल्याने हा भारताचा अपमान आहे. आम्ही आयसीसीला याबाबत सांगू. त्यांचं म्हणणं आहे की आयसीसीने यामध्ये सुधार आणावा किंवा आम्ही भारतातील क्रिकेट इंटरेस्ट वाचवण्यासाठी काहीही करु. आम्ही चँपियंस ट्रॉफीमधून नाव मागे देखील घेऊ शकतो. अशी वेळ येऊ नये पण आमच्याकडे दुसरे देखील पर्याय आहेत.