उद्यापासून ऑस्ट्रेलियन ओपनचा थरार

2017 च्या टेनिस सिझनची सुरूवात ऑस्ट्रेलियन ओपनच्या थरारानं होणारय. यावेळची ऑस्ट्रेलियन ओपन अनेक अर्थानं महत्त्वाची ठरणारय.  

Updated: Jan 15, 2017, 09:33 AM IST
उद्यापासून ऑस्ट्रेलियन ओपनचा थरार title=

सिडनी : 2017 च्या टेनिस सिझनची सुरूवात ऑस्ट्रेलियन ओपनच्या थरारानं होणारय. यावेळची ऑस्ट्रेलियन ओपन अनेक अर्थानं महत्त्वाची ठरणारय.  

जोकोविचला आपलं अव्वल स्थान कायम राखण्याच आव्हान असेल. तर अमेरिकन जायंट सेरेना विल्यमसला पुन्हा नंबर वन स्थान काबीज करण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतील. 

जोकोविच, सेरेना दुखापतींवर मात करत नव्या सिझनसाठी सज्ज झालेयत. तर रॉजर फेडरर आणि नदाल आपलाच ग्रॅंड स्लॅम दुष्काळ संपवण्यासाठी आतुर असतील. 

भारताच्या आशा पुन्हा एकदा वुमन्स डबल्समध्ये सानियावरच असतील. सानिया, स्ट्रायकोव्हा या नव्या पार्टनरसह टेनिस कोर्टवर उतरणारय.  त्यामुळे सानियावर भारताला पुन्हा एकदा भारताला ग्रॅडस्लॅम जिंकून देण्याचं दडपण असणारय.