कसोटी मालिका हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पाहा काय बोलला?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 28, 2017, 06:22 PM IST
कसोटी मालिका हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पाहा काय बोलला? title=

धर्मशाला : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. अजिंक्य राहाणे यांच्या नेतृत्वाखाली भारताने विजयाची गुडी उभारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने भारतीय क्रिकेट टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्यात.

शेवटच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या विजयाचे श्रेय टीम इंडियाला जाते. टीम इंडियाने चांगेल काम केले आहे. सामना रोमांचक स्थितीत होता. या कसोटी सामन्यातून बरेच काही शिकायला मिळाले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखील भारताने श्रीलंकेत 2015 मध्ये यजमान लंकेला हरवून कसोटी मालिका जिंकली. आता ऑस्ट्रेलियाला 2-1 असे हरवत सातत्याने ही सातवी मालिका जिंकली आहे.