अनुष्कानं मेलबर्नमध्ये गुंफला विराटच्या हातात हात!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी दोघांनीही आपलं रिलेशनशीप लोकांपासून लपवून ठेवलेलं नाहीय. पण, दोघं ते उघडपणे कबूलही करत नाहीत... आत्ता, नुकतंच हे जोडपं ऑस्ट्रेलियात एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसलं. 

Updated: Dec 26, 2014, 06:56 PM IST
अनुष्कानं मेलबर्नमध्ये गुंफला विराटच्या हातात हात! title=

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी दोघांनीही आपलं रिलेशनशीप लोकांपासून लपवून ठेवलेलं नाहीय. पण, दोघं ते उघडपणे कबूलही करत नाहीत... आत्ता, नुकतंच हे जोडपं ऑस्ट्रेलियात एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसलं. 

भारतात अनेक वेळा वेगवेगळ्या निमित्तानं ही दोघं एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताना दिसतात. सध्या अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियात विराटसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी पोहचलीय. 

'पीके'च्या यशामुळे अनुष्का सध्या भलतीच खूश आहे... हे यशही ती विराटसोबत सेलिब्रेट करणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, दोघंही मेलबर्नच्या एका हॉटेलमधून ख्रिसमस पार्टीनंतर एकत्र बाहेर पडताना दिसले... यावेळी, या दोघांनीही एकमेकांच्या हातात हात गुंफले होते. 

यावेळी, हे लव्ह बर्डस् एका कॅमेऱ्यात कैद झाले... जेव्हा त्यांचा फोटो काढला जात आहे हे विराटच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं फोटो काढण्यास मनाई केली... यावेळी, त्याचा हात अनुष्काच्याच हातात होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.