कतरिना-रणबीरनंतर आता विराट-अनुष्का राहणार एकत्र?

टीम इंडियाचा दमदार बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा... या लव्हबर्ड्सची प्रेमकहानी तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेत... वेळोवेळी ते त्यांनी कबुलही केलंय.

Updated: Oct 26, 2015, 10:15 AM IST
कतरिना-रणबीरनंतर आता विराट-अनुष्का राहणार एकत्र? title=

मुंबई: टीम इंडियाचा दमदार बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा... या लव्हबर्ड्सची प्रेमकहानी तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेत... वेळोवेळी ते त्यांनी कबुलही केलंय.

नुकतंच त्यांच्यात काही ठिक नसल्याची चर्चा होती. लग्नाच्या निर्णयावरून दोघांमध्ये भांडण होत असल्याचं बोललं जात होतं. पण वानखेडे स्टेडियमवर अखेरच्या वनडे मॅचमध्ये असलेली अनुष्काची उपस्थिती काही तरी वेगळंच सांगून जाते.

आणखी वाचा - विराट - अनुष्कात दुरावा, सर्व काही ठिक नाही!

आता हे दोघं एकत्र राहणार असल्याची चर्चा आहे. वरळीमधील एका इमारतीत फ्लॅट बुक करून एकत्र राहण्याचं दोघांनी ठरवल्याचं कळतंय. 

यापूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे सुद्धा एकत्र राहत आहेत. आता तसाच निर्णय विराट-अनुष्कानं घेतलाय का? हे आगामी काळ स्पष्ट करेल. 

आणखी वाचा - अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.