वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू अॅंड्रे फ्लेचरला अटक

वेस्ट इंडिजचा विकेटकीपर अॅंड्रे फ्लेचर याला डगलस चार्ल्स विमानतळावर अटक झाली आहे. बंदुकीचे ५० काडतुसं जवळ बाळगल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Updated: May 30, 2015, 05:17 PM IST
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू अॅंड्रे फ्लेचरला अटक title=

डॉमिनिका: वेस्ट इंडिजचा विकेटकीपर अॅंड्रे फ्लेचर याला डगलस चार्ल्स विमानतळावर अटक झाली आहे. बंदुकीचे ५० काडतुसं जवळ बाळगल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. 

डॉमिनिका न्यूज ऑनलाईनने दिलेल्या माहितीनुसार, विंडवर्ड आइसलॅंड टीमसोबत फ्लेचर डॉमिनिकामध्ये सराव करत होता. अटक झाली त्यावेळी तो देश सोडून जात होता. रिपोर्टनुसार त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आलं. 

अॅंड्रे फ्लेचरने वेस्ट इंडिजकडून 15 वनडे आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. 2008मध्ये फ्लेचरची वेस्ट इंडिज संघात निवड झाली होती. यावर्षी जानेवारी महिन्यात फ्लेचर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शेवटचा सामना खेळलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.