मुंबई : किंग्स इलेवन पंजाबचा स्पिनर अक्षर पटेल याने इंडियन प्रीमयर लीगच्या ९ व्या सीजनमध्ये हॅट्रीक घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. गुजरात लायन्सच्या विरोधात त्याने ३ बॉलमध्ये तीन विकेट घेत या सीजनमधला हॅट्रीक घेणारा पहिला बॉलर ठरला आहे.
रविंद्र जडेजाला तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आऊट करत त्याने हॅट्रीक घेतली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये कार्तिक आणि ब्रॅवोला त्याने बोल्ड केलं. अक्षर पटेल किंग्स इलेवन पंजाबकडून हॅट्रीक घेणारा दूसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी युवराज सिंगने २ वेळा किंग्स इलेवन पंजाबसाठी हॅट्रीक घेतली आहे. पटेलने ४ ओव्हरमध्ये २१ रन देत ४ विकेट घेतल्या.
आयपीएल इतिहासात सर्वात अधिक हॅट्रीक घेण्याचा रेकॉर्ड अमित मिश्रा याच्या नावावर आहे. त्याने ३ वेळा हा कारनामा केला आहे. आईपीएलमध्ये पहली हॅट्रीक २००८ मध्ये लक्ष्मीपती बालाजीने चेन्नईकडून खेळतांना घेतली होती.