झिम्बाब्वेला हरवत अफगाणिस्तान सुपर १०मध्ये

मोहम्मद नबीने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील साखळी सामन्यात झिम्बाब्वेला हरवत सुपर १०मध्ये शानदार प्रवेश केला. 

Updated: Mar 13, 2016, 08:41 AM IST
झिम्बाब्वेला हरवत अफगाणिस्तान सुपर १०मध्ये title=

नागपूर : मोहम्मद नबीने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील साखळी सामन्यात झिम्बाब्वेला हरवत सुपर १०मध्ये शानदार प्रवेश केला. 

नबीने ३२ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ५२ धावांची दमदार खेळी केली. त्याला शमीउल्ला शेनवारी (४३) याने नबीला चांगली साथ देत ९८ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे अफगाणिस्तानने सहा विकेट गमावून १८६ धावांची मजबूत खेळी केली आणि झिम्बाब्वेसमोर चांगले आव्हान ठेवले. 

अफगाणिस्तानच्या या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ मात्र १२७ धावांवर संपुष्टात आला. यासोबतच अफगाणिस्तानने सुपर १० मध्ये प्रवेश केलाय. अफगाणिस्तान इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या ग्रुपमध्ये खेळणार आहे.