दुखापतग्रस्त कोहलीऐवजी डिव्हिलियर्स आरसीबीचा कॅप्टन

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला येत्या पाच तारखेपासून सुरुवात होत आहे.

Updated: Mar 30, 2017, 08:03 PM IST
दुखापतग्रस्त कोहलीऐवजी डिव्हिलियर्स आरसीबीचा कॅप्टन  title=

बंगळुरू : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला येत्या पाच तारखेपासून सुरुवात होत आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली दुखापतग्रस्त असल्यामुळे कॅप्टनशीपची धुरा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सकडे सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची टेस्टवेळी फिल्डिंग करत असताना कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टलाही कोहलीला मुकावं लागलं होतं. या दुखापतीतून सावरण्यासाठी आपल्याला काही आठवडे लागतील असं कोहलीनं सांगितलं होतं. यामुळे आरसीबीनं डिव्हिलियर्सला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली फिट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याकडे आरसीबीचं नेतृत्व देण्यात येणार आहे.