एरॉन फिंचच्या छातीवर आदळला उसळलेला बाऊन्सर

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या मृत्यूनंतर अनेकदा उसळलेल्या बाउन्सरनं क्रिकेटर्सना जखमी केलंय. यावेळी, बाऊन्सरचा शिकार ठरलाय तो ऑस्ट्रेलियन टीमचा सलामीचा बॅटसमन एरोन फिंच...

Updated: Jun 24, 2015, 11:22 AM IST
एरॉन फिंचच्या छातीवर आदळला उसळलेला बाऊन्सर title=

दिल्ली : माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या मृत्यूनंतर अनेकदा उसळलेल्या बाउन्सरनं क्रिकेटर्सना जखमी केलंय. यावेळी, बाऊन्सरचा शिकार ठरलाय तो ऑस्ट्रेलियन टीमचा सलामीचा बॅटसमन एरोन फिंच...

एरॉन फिंच सध्या ऑस्ट्रेलियात काऊंटी क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. सोमवारी क्रिकेट खेळत असताना२८ वर्षांच्या उसळलेला बाऊन्सर फिंचच्या छातीवर आदळला. यामध्ये फिंच गंभीर जखमी झाला. 

यावेळी, बर्मिंघममध्ये योर्कशिर आणि वेर्सीटेरशिर या टीम्समध्ये मॅच सुरू होती. फिंच १९ रन्सच्या स्कोअरवर मैदानात खेळत होता. क्रिस रसैलनं टाकलेल्या बॉलला पूल शॉट मारण्यासाठी पुढे झालेल्या फिंचचा निशाणा चुकला आणि बॉल त्याच्या छातीवर आदळून जमिनीवर पडला.

फिंच जमिनीवर कोसळल्यानंतर धास्तावलेल्या क्रिकेटर्सनं त्याच्याकडे धाव घेतली. यावेळी, त्याच्या तोंडातून रक्त बाहेर आलं होतं. यानंतर त्याला तात्काळ हॉस्पीटलमध्ये धाडण्यात आलं. अर्थात या प्रसंगामुळे मॅच रद्द करण्यात आली. 

योग्य उपचार झाल्यानंतर आणि सावधगिरी म्हणून स्कॅन आणि एक्स रे काढल्यानंतर मंगळवारी फिंचला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाला. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.