४५ ओव्हरमध्ये बनवले तब्बल ८४४ रन्स

बंगला क्रिकेट संघ शाळेच्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोमवारी नावा नालंदा शाळेने ज्ञान भारती शाळेविरुद्ध खेळताना ४५ ओव्हरमध्ये तब्बल ८४४ रन्सचा डोंगर रचला. 

Updated: Feb 23, 2016, 10:58 AM IST
४५ ओव्हरमध्ये बनवले तब्बल ८४४ रन्स title=

कोलकाता : बंगला क्रिकेट संघ शाळेच्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोमवारी नावा नालंदा शाळेने ज्ञान भारती शाळेविरुद्ध खेळताना ४५ ओव्हरमध्ये तब्बल ८४४ रन्सचा डोंगर रचला. 

महापौर चषक स्पर्धेत नालंदाकडून श्रेयस बॅनर्जीने ७८ बॉलमध्ये १९३ रन्स बनवले तर इमान चौधरी आणि दिपांशु सरकार यांनी अनुक्रमे १७९ आणि १७६ रन्स बनवले. 

या तिघांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर संघाला ४५ ओव्हरमध्ये ८४४ रन्सचा टप्पा गाठता आला. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाला ११.३ ओव्हरमध्ये ३२ रन्स बनवता आल्या.