साऊथहॅम्पटन: भारत आणि इंग्लंडच्या साऊथहॅम्पटन टेस्टचा पहिला दिवस निराशाजनक होता. इंग्लंडनं दिवस अखेर 2 बाद 247 रन्स केले. दिवस निराशाजनक राहिला असला तरी काहींनी चांगले रेकॉर्ड्स मात्र बनवले. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, अॅलेस्टर कुक, पंकज सिंह आणि गॅरी बॅलेन्स यांचा समावेश आहे.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं इंग्लंडमध्ये 6 पेक्षा जास्त कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवण्याचा रेकॅार्ड आपल्या नावे केला आहे. याआधी अजित वाडेकर आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी 6 वेळा, तर सौरव गांगुली यांन 4 वेळा कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवलंय.
दुखापत झालेल्या ईशांत शर्माच्या जागी संधी मिळालेल्या आणि कारकिर्दीतला पहिला सामना खेळणारा पंकज सिंह हा सगळ्यात अनुभवी डोमेस्टिक क्रिकेटर बनला आहे. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेतल्या आहेत तर याआधी हा रेकॅार्ड विनय कुमारच्या नावे होता.
इंग्लडचा कर्णधार अॅलेस्टेर कुकनं 95 रन्स केल्यानंतर हा त्याचा या वर्षातील सर्वश्रेष्ठ स्कोअर आणि पहिलं अर्धशतक ठरलं. या व्यतिरिक्त 22 हा त्याचा सर्वश्रेष्ठ स्कोअर आणि 35 कसोटी डावानंतर पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना त्यानं केला आहे शिवाय केविन पीटरसन आणि डेविड गोवरला मागे सोडत 8257 रन्स करून कसोटी सामन्यात सर्वात जास्त रन्स करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
104 रन्स बनवत नाबाद असलेला गॅरी बॅलेन्स यानं मालिकेतली दूसरं शतक ठोकलंय. तो या मोलिकेत 312 रन्स करतं सर्वात जास्त रन्स करणाऱ्य़ा खेळाडूंमध्ये दूसऱ्य़ा क्रमांकावर आहे. तर भारताचा मुरली विजय 317 रन्स करत पहिल्या क्रमांकावर आहे. 25 वर्षाचा गॅरीनं पाचव्यांदा 50 पेक्षा जास्त रन्स बनवले असून वयाच्या 25व्या वर्षाअगोदर 50 पेक्षा जास्त रन्स करणाऱ्य़ा इंग्लच्या खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.